पृथ्वीवर अनेक जीव-जंतु असतात, ज्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये लोकांना माहिती नसतात.
साप म्हटले की सर्वांच्याच अंगावर काटा येतो. सापाबद्दल अनेक गोष्टी आहेत, ज्या फार कमी लोकांना माहित असतात.
झोपेच्या बाबतीत साप माणसांनाही मागे टाकतो. या गाढ झोपेमुळे त्यांचे वजनही खूप वाढू लागते.
हिवाळ्याच्या मोसमात साप कधी कधी आठवडे किंवा महिनाभर गाढ झोपेत जातात. या काळात ते बिळात किंवा गुहेत लपून राहतात.
हिवाळ्यात साप 20 ते 22 तास झोपतात. गाढ झोपेत असताना ते हळूहळू श्वास घेतात.
थंडीच्या काळात साप जास्त झोपल्यामुळे ते सुस्त होतात. साप झोपेत असताना ते मृत प्राण्यांसारखेही भासतात.
या गाढ झोपेच्या दरम्यान त्यांचे मेटाबॉलिझम खूप मंद होते आणि शरीरातील तापमानही कमी होते. यामुळे सापांना जास्त अन्नाची आवश्यकता नसते.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)