विमानांचा रंग पांढरा का असतो ? जाणून घ्या, यामागचं कारण

Jan 22,2025

विमानांचा रंग

अधिकतर विमानांचा रंग हा पांढरा असतो. काही कंपन्या विमानाच्या खालच्या बाजूस पेंट करतात. मात्र, विमानाचा अधिक भाग हा पांढराच असल्याचं आपण पाहतो. काय आहे नेमकं कारण?

विमानाचा रंग पांढराच का?

कोणतीही एअरलाइन असली, तरी विमानाचा मोठा भाग हा पांढऱ्या रंगाचाच का असतो? असा प्रश्न अनेकांना पडत असेल.

सुरक्षितता

पांढऱ्या रंगाचे विमान आकाशातून अगदी सहजपणे पाहता येते. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून विमानाला पांढरा रंग दिला जातो. यामुळे अपघात टाळता येतात.

तापमान नियंत्रण

सुर्याच्या प्रकाशाचे परावर्तन होण्यासाठी पांढरा रंग हे उत्तम माध्यम आहे. खास करुन उंच उड्डाणांमध्ये पांढऱ्या रंगामुळे विमानाचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.

इंधनाची बचत

गडद रंग हे जास्त उष्णता शोषतात आणि यामुळे एअर कंडीशनिंगवर अधिक दबाव पडतो. म्हणून पांढरा रंग इंधनाची बचत करण्यासाठी फायदेशीर मानला जातो.

विमानाची सुस्थिती

विमानाच्या पांढऱ्या रंगामुळे विमानावरील ओरखडे किंवा काही चीर सहजतेने दिसू शकते. त्यामुळे विमानाच्या वेळीच दुरुस्तीसाठी पांढऱ्या रंगाची मदत होते.

दुरुस्तीसाठी कमी खर्च

गडद रंगासाठी वारंवार पेंट करण्याची आवश्यकता भासते. पांढऱ्या रंगासाठी विमानाला वारंवार पेंट करण्याचा खर्च कमी होतो आणि विमान अधिक टिकाऊ बनण्यासाठी पांढरा रंग हा फायद्याचा मानला जातो.

ब्रँडिंगसाठी उपयुक्त

पांढरा रंग हा ब्रँडिंगच्या पायासाठी उत्तम मानला गेला आहे. एअरलाइन्स पांढऱ्या रंगावर डिझाइन किंवा लोगो सोप्या पद्धतीने जोडू शकतात.

पांढऱ्या रंगाचे वैज्ञानिक वैशिष्ट्य

पांढऱ्या रंगाचे परावर्तनाचे वैशिष्ट्य इतर रंगांच्या तुलनेत अधिक व्यावहारिक मानलं गेलं आहे. यामुळे पांढऱ्या रंगाला विमान अधिक काळ टिकवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं मानलं गेलं आहे.

VIEW ALL

Read Next Story