वेलची ही फक्त पदार्थाची चव वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते.
रिकाम्या पोटी वेलचीचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित आजार बरे होतात आणि पोट नेहमी स्वस्थ राहते.
वेलचीमध्ये फायबर असते ज्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. तसेच वेलचीचे सेवन गॅस, अपचनाची समस्या दूर करण्यास उपयोगी ठरते.
वेलचीच्या सेवनाने भूक वाढण्यास मदत होते, ज्यामुळे शरीरातील कमजोरी दूर होते.
वेलचीमध्ये पोटॅशियम आणि फायबरचे चांगले प्रमाण आढळते, ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले होते.
वेलचीच्या पाण्याचे सेवन केल्याने ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येण्यास मदत होते.
वेलचीचे सेवन केल्याने केसांचे आरोग्य चांगले राहते. केस मजबूत होऊन त्यांची वाढ होते तसेच केस काळेभोर होतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)