नैसर्गिक गुळाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
अनेकजण रात्री गुळाचे सेवन करण्यास प्राधान्य देतात, परंतु असे न करता सकाळी रिकाम्या पोटी गुळाचे सेवन केल्यास त्याने अनेक आजार दूर पळतात.
गुळाच्या सेवनाने पचनक्रिया मजबूत होते. ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
सकाळी रिकाम्यापोटी गुळाचा एक तुकडा खाऊन त्यावर कोमट पाण्याचे सेवन केल्याने गॅसची समस्या दूर होते.
हिवाळ्याच्या दिवसात सकाळी गुळाचे सेवन केल्याने शरीर उबदार राहते. गुळात कार्बोहायड्रेट असल्याने शरीराला एनर्जी मिळते.
गुळात आयरनचे चांगले प्रमाण आढळते. सकाळी कोमट पाण्यासोबत गुळाचे सेवन केल्यास रक्त स्वच्छ होण्यास मदत होते.
गुळात सोडियम आढळते, ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येण्यास मदत होते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)