व्हिटॅमिन ई कॅप्सूल ही चेहऱ्याला उजळ बनवण्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. या कॅप्सूलच्या वापरामुळे त्वचेशी संबंधित समस्यासुद्धा दूर राहण्यास मदत होते.
परंतु, हिवाळ्यात चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर योग्य आहे की नाही? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
हिवाळ्यात चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावणे खरंच फायदेशीर ठरु शकते कारण याच्या वापरामुळे तुम्हाला कोरियन त्वचेसारखा ग्लो मिळू शकतो.
व्हिटॅमिन ई कॅप्सूल चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील मुरुमं दूर राहण्यास मदत होते.
व्हिटॅमिन ई कॅप्सूलच्या वापरामुळे चेहऱ्यावरील डागसुद्धा कमी होण्यास मदत होते.
हिवाळ्यात चेहरा मॉइश्चराइज ठेवण्यासाठीसुद्धा व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर फायदेशीर ठरतो.
हिवाळ्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर केल्याने त्वचेचा फ्री रेडिकल्स पासून बचाव होतो.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)