वजन कमी करण्यासाठी दिवसभरात किती वेळ चालावं?

Pooja Pawar
Oct 14,2024


चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे. चालल्याने वजन कमी होण्यास सुद्धा मदत होते.


चालण्याने पचनक्रिया चांगली राहते आणि चयापचयाची गती वाढते.


चालण्याने तुम्ही दिवसभर एनर्जेटिक राहता, आणि शरीरात ऊर्जा निर्माण होते.


सकाळी आणि संध्याकाळी चालण्याने दुप्पट कॅलरीज बर्न होतात.


संध्याकाळी चालण्याने ताणतणाव कमी होतो. मनाला शांतता मिळते आणि रात्री चांगली झोप लागते.


वजन कमी करण्यासाठी तुम्ही दिवसातून जवळपास 3 हजार ते 4500 पावलं चालायला हवं असं तज्ज्ञ सांगतात.


वजन कमी करण्यासाठी फक्त चालणे हा व्यायाम पुरेसा नसतो. तर त्यासोबत आहारावर देखील विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story