जास्त तिखट किंवा बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने काही लोकांच्या पोटात गॅस तयार होऊन त्रास होऊ शकतो.
काहींना तर रोजच सकाळी उठल्यावर गॅसचा त्रास होतो. ज्याने लोक खूप त्रस्त असतात.
या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी जाणून घेऊया यावरील काही उपाय
गॅसच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही रोज ओव्याचे पाणी प्यायला हवे. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते, चयापचन वाढते आणि पोटासंबंधीत अनेक समस्या दूर होतात.
आलं आणि तुलसी एकत्र उकळवून प्यायल्यास तुम्ही गॅसच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. यामुळे पचन सुधारून रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
हिंगामुळे फक्त जेवणाची चव वाढत नाही तर पोटदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो. पोटात गॅस होण्याची समस्याही दूर होते.
कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस टाकून ते पाणी रोज सकाळी उपाशी पोटी प्यायल्यास गॅसची समस्या दूर होण्यास मदत होते.
ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे आतड्याच्या आरोग्य सुधारण्यास मदत करतात. तर आलं आणि धण्यांमध्ये पाचक आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. तुम्ही एक कप ताकात एक चमचा किसलेलं आलं आणि एक चमचा चिरलेली कोथिंबीर घालून जेवणानंतर पिऊ शकता.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)