दाक्षिणात्य चित्रपटांमधील प्रसिद्ध खलनायक असलेल्या प्रदीप रावत यांच्याकडे मीडिया रिपोर्ट्सनुसार 41 कोटींची संपत्ती आहे.
जगपति बाबू यांनी अनेक गाजलेल्या तेलगू चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका केली असून त्यांची संपत्ती ही जवळपास 100 कोटी इतकी आहे.
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने सुद्धा अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका केली असून त्याची संपत्ती 120 कोटी आहे.
अभिनेता आशुतोष राणा याने चित्रपटांमध्ये केलेल्या खलनायकाच्या भूमिका गाजल्या असून राणा सुमारे 55 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.
राणा दग्गुबती याचा बाहुबली चित्रपटातील खलनायकाची भूमिका फार गाजली. याची एकूण संपत्ती 45 कोटी इतकी आहे.
आशीष विद्यार्थी हे बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटांमधील प्रसिद्ध खलनायक असून त्यांची एकूण संपत्ती 82 कोटींच्या घरात आहे.
अभिनेते मुकेश रिषी यांना दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका करताना मोठी प्रसिद्धी मिळाली. ते जवळपास 41 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.
अभिनेता संजय दत्त याने KGF 2 या चित्रपटात खलनायकाची भूमिका केली होती. संजय दत्तची एकूण संपत्ती 295 कोटींच्या घरात आहे.
प्रकाश राज हे सुद्धा बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमधील प्रसिद्ध खलनायक आहेत. ते जवळपास 36 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.
मराठी, हिंदी तसेच दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केलेले अभिनेते सयाजी शिंदे यांनी समाजकारणानंतर आता राजकारणाची वाट धरली आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
सयाजी शिंदे यांची एकूण संपत्ती किती आहे याबाबत स्पष्ट माहिती मिळाली नसली तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार सयाजी शिंदेकडे 28 ते 30 कोटींची संपत्ती आहे.