अंड उकडल्यानंतर पिवळ्या बलकाभोवती राखाडी आवरण का दिसू लागतं?

Sayali Patil
Feb 13,2025

अंड

अंड हे प्रोटीन अर्थात प्रथिनांचा एक उत्तम स्त्रोत असून, वजन कमी करण्यापासून ते वाढवण्यापर्यंतच्या प्रवासात ते आहारातील महत्त्वाचा घटक ठरतं.

शरीराला अनेक फायदे

अंड्याचे शरीराला अनेक फायदे होतात. असं हे अंड अनेक प्रकारे खाता येतं.

उकडलेलं अंड

उकडून, ऑम्लेट बनवून, करी स्वरुपात किंवा आणखी नवनवीन प्रकारे अंड आणि त्यापासून तयार केलेले पदार्थ आवडीनं खाल्ले जातात. त्यात उकडलेलं अंड अनेकांच्याच आवडीचं.

आवरण

अंड उकडल्यानंतर त्याच्या पिवळसर बलकाभोवती एक राखाडी रंगाचं आवरण दिसतं. जे अनेकांनाच आवडत नाही.

रासायनिक प्रक्रिया

प्रत्यक्षात हे आवरण अंड्यातील लोहयुक्त घटक आणि सल्फर यांच्यातील रासायनिक प्रक्रियेमुळं तयार होऊन त्यातून आयर्न सल्फाईड तयार होतं.

लोह

पूर्णत: उकडलेल्या अंडांमध्ये हे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून हे राखाडी आवरण अधिक गडद असल्याचं दिसून येतं. ते काहीशा हिरव्या रंगाकडेही झुकणारं असतं. (ही माहिती उपलब्ध संदर्भांवरून घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story