भारत सरकारने आतापर्यंत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 53 लोकांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे.
भारतरत्नने सन्मानित व्यक्तींना केवळ पुरस्कारच नाही तर त्यासोबत विविध सुविधा सुद्धा मिळतात.
भारतरत्न प्राप्त व्यक्तीला संसदेत भाग घेण्याची संधी मिळते. सोबतच त्यांना कॅबिनेट मंत्रांच्या बरोबर VIP दर्जा दिला जातो.
भारतरत्नने सन्मानित व्यक्तीला income tax न भरण्याची सूट दिली जाते.
तसेच भारतरत्न प्राप्त व्यक्तीला Air India फस्ट क्लास आणि रेल्वेमध्ये फस्ट क्लासमधून प्रवास करण्याची सुविधा दिली जाते.
देशातील कोणत्याही राज्यात प्रवास करताना त्यांना विशेष अतिथी तसेच VIP दर्जा दिला जातो. त्यांना विशेष सुविधा सुद्धा दिल्या जातात.
स्वातंत्र्य दिवस आणि प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते विशेष अतिथी म्हणून सहभागी होऊ शकतात.
गरज असल्यास भारतरत्नने सन्मानित व्यक्तींना सरकार Z ग्रेडची सुरक्षा देते.
भारतरत्नने सन्मानित व्यक्तीने विदेश यात्रा केल्यास तेथे भारतीय दूतावासाच्या माध्यमातून त्यांना विशेष सुविधा दिल्या जातात.
भारतरत्नने सन्मानित व्यक्तींना सरकार वॉरंट ऑफ प्रेसिडेंसमध्ये जागा देते. वॉरंट ऑफ प्रेसिडेंसचा वापर सरकारी कार्यक्रमांमध्ये प्रथम प्राधान्य देण्यासाठी वापरला जातो.