डॉक्टर तसेच तज्ज्ञ व्यक्ती दिवसभरता एकतरी फळ खायला हवं असा सल्ला देतात. फळांच्या सेवनाने शरीराला अनेक पोषकतत्व मिळतात.
परंतु अनेक लोकं फळ खाण्याऐवजी फळांचा ज्यूस पिण्यास प्राधान्य देतात. परंतु ज्यूस ऐवजी फळ खाणं हे जास्त फायदेशीर असून यातून शरीराला फायबर मिळतं.
फायबर रक्तातील शुगर शोषून घेण्याची प्रक्रिया हळू करण्यास मदत करते. परंतु तरी देखील अनेकजण फळांचा ज्यूस काढून पितात. परंतु काही अशी फळं आहेत, ज्यांचा ज्यूस काढून पिण्याची चूक करू नये असा सल्ला तज्ज्ञ देतात.
आंब्याचं ज्यूस काढून पिणं टाळायला हवं कारण यात भरपूर प्रमाणात नैसर्गिक साखर असते. जर तुम्ही आंब्याचा ज्यूस प्यायलात तर शरीरात साखरेचे प्रमाण एकदम वाढते.
द्राक्ष फळाचं ज्यूस काढू नये. द्राक्षांमध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्व असते ज्यामुळे त्यांचं सेवन अख्खचं करायला हवं.
कलिंगडामध्ये नैसर्गिक साखर असते. डायबेटिजच्या रुग्णांनी याचे जास्त सेवन करू नये. कलिंगडाचा ज्यूस काढल्याने त्यातील फायबर निघून जाते आणि फळातील शुगर शरीरात सहज शोषून घेतली जाते.
अननसाचा ज्यूस खूप गोड असतो. अननसाचा ज्यूस प्यायल्यास रक्तातील साखर वाढते.
संत्रीचा ज्यूस करून खाणे टाळायला हवे. याच्या सेवनाने शुगर वाढते तसेच हे संत्र्यामध्ये ऍसिडिटी नेचर सुद्धा असते, ज्यामुळे शरीराला नुकसान पोहोचू शकते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)