भारतीय रेल्वेला (Indian Railways) भारताची लाइफलाइन असं म्हटलं जातं.
दररोज लाखोंच्या संख्येने लोक रेल्वेने प्रवास करतात.
रेल्वेचा प्रवास सर्वांच्या खिशाला परवडणारा असतो. तसंच, वेळेची बचत करत योग्य ठिकाण गाठता येतं.
तुम्हाला माहित आहे का, भारतातील पहिलं म्हणजेच सर्वात जुनं रेल्वे स्टेशन कोणतं?
'बोरीबंदर' हे भारतातील सर्वात जुनं रेल्वे स्टेशन आहे. हे रेल्वे स्टेशन आता 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस' या नावाने ओळखलं जातं.
1853 मध्ये बोरीबंदर रेल्वे स्टेशनची निर्मिती झाली होती.
भारतात सर्वात पहिली ट्रेन 1853 मध्ये बोरीबंदर ते ठाण्यापर्यंत धावली होती.
काही काळानंतर बोरीबंदर रेल्वे स्टेशनचं नाव 'व्हिक्टोरिया टर्मिनस' असं ठेवण्यात आलं होतं. 1996 मध्ये हे नाव बदलून 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस' असं ठेवण्यात आलं.