मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी अंबानी यांच्या अँटिलिया या घराची एक बहुमजली इमारत आहे. जागतिक स्तरावरही ही इमारत कुहूहलाता विषय ठरते.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण अंबानींहूनही मोठ्या घरात भारतातील एक महाराणी आपल्या कुटुंबासमवेत राहतात. त्यांचं नाव आहे राधिकाराजे गायकवाड.
राधिकाराजे आणि त्यांचं कुटुंब वडोदरा येथील लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये राहतात. या वास्तूची मालकी गायकवाड कुटुंबाकडेच आहे.
शाही कुटुंबांचे वंशज हीज हायनेस समरजीतसिंह गायकवाड आणि त्यांच्या पत्नी राधिकाराजे गायकवाड यांच्या हाती सध्या या महालाची सूत्र आहेत.
जगातील सर्वात मोठा खासगी निवास म्हणून या वास्तूला ओळखलं जातं. ब्रिटनच्या शाही कुटुंबाच्या बकिंघम पॅलेसहून हा महाल चारपट मोठा आहे.
उपलब्ध माहितीनुसार गुजरातमधील हा महाल 700 एकरांच्या भूखंडावर तयार करण्यात आला असून, त्याचं क्षेत्रफळ 3,04,92, 000 इतकं आहे. 170 हून अधिक खोल्या असणाऱ्या या पॅलेसची निर्मीती सयाजीराव गायकवाड तृतीय यांनी 1890 मध्ये केली होती.
राहिला मुद्दा अंबानींच्या घराचा, तर त्यांच्या घराचं क्षेत्रफळ आहे 48780 चौरस फूट. थोडक्यात लक्ष्मीविलास पॅलेस त्याहून कैक पटींनी मोठं आहे.
त्या काळात हा महाल उभा करण्यासाठी साधारण 180,000 GBP म्हणजेच 1,82,57,711.45 रुपये इतका खर्च आला होता.