ओडिशाचे मुख्य सचिव पीके जेना यांच्या अध्यक्षतेखालील समितीने डीआरडीओ जानेवारी ते मार्च दरम्यान ओडिशाच्या किनारपट्टीवरील व्हीलर बेटावर क्षेपणास्त्र चाचणी घेणार नाही, असे म्हटलं आहे.
त्यामागचे कारण आहे ऑलिव्ह रिडले कासव. या कासवांची घरटी बांधण्याची वेळ नोव्हेंबर ते मे पर्यंत असते. यावर्षी सुमारे 5 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी येथे घरटी बांधले आहेत.
ऑलिव्ह रिडले समुद्री कासव ओडिशाच्या समुद्रकिना-यावर मोठ्या प्रमाणावर प्रजनन करतात, म्हणूनच या काळात ओडिशाच्या व्हीलर बेटावर क्षेपणास्त्र चाचणी घेतली जाणार नाही.
क्षेपणास्त्र चाचणीदरम्यान कासवांचे लक्ष चमक आणि आवाजामुळे विचलित होऊ शकते. त्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
ऑलिव्ह रिडलीच्या घरट्याची वेळ नोव्हेंबरमध्ये सुरू होते. या वर्षी किनारपट्टीवर पहिला ऑलिव्ह रिडले दिसताच, ओडिशा सरकारने 1 नोव्हेंबर 2023 ते 31 मे 2024 या कालावधीत त्यांच्या घरटी क्षेत्रात मासेमारीवर बंदी घातली आहे.
ऑलिव्ह रिडलेची कवच आणि अंडी तेल आणि खत बनवण्यासाठी वापरतात. त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार होण्याचा धोका आहे.
त्यामुळे कासवांच्या सुरक्षेसाठी डीआरडीओ अधिकाऱ्याची नियुक्ती करणार आहे. या कासवांपर्यंत मासेमारी करणाऱ्या नौका पोहोचू नयेत यासाठी लष्कर आणि तटरक्षक दल गस्त घालणार आहेत.