साप खरंच मीठाचं वर्तुळ पार करु शकतो का?
साप हा जीवघेणा भयानक प्राणी असून त्याचं नुसतं नाव घेतलं तरी लोकांना घाम फुटतो.
निसर्गाच्या सान्निध्यात राहणारा साप अनेक वेळा घरामध्ये शिरताना आपण पाहिलं आहे. त्यामुळे काही लोक सांगतात की साप हा मीठाला घाबरतो.
त्यामुळे खासकरून पावसाळ्यात दारावर मीठाची लक्ष्मणरेषा आखावी असं सांगितलं जातं. काय खरंच साप मीठाला घाबरतो का?
अशी मान्यता आहे की, मीठामुळे सापाची कातडी जळते म्हणून तो मीठापासून दूर पळतो. त्यावर संशोधन करण्यासाठी सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे.
मीठाला साप घाबरतो की नाही हे दाखविणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या हा व्हिडीओ इंटरनेटवर ट्रेंडिंगमध्ये आहे.
या व्हिडीओमध्ये जगातील भयानक आणि विषारी अशा किंग कोब्रासोबत प्रयोग करण्यात आला. त्यातील दृश्यं पाहून तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल.
एका प्रसिद्ध YouTuberने साप आणि मिठाचं कनेक्शनची पोलखोल केली आहे. या व्हिडीओमध्ये दोन सापाला त्याने मीठाच्या वर्तुळात ठेवलं आहे.
तुम्ही पाहू शकता पहिला किंग कोब्रारा ताबडतोब या वर्तुळातून बाहेर आला तर दुसरा सापदेखील काही वेळानंतर बाहेर आला.
या व्हिडीओतील प्रयोगावरुन हे सिद्ध होतं की, किंग कोब्रा हा मीठाला घाबरत नाही. या व्हिडीओला आतापर्यंत कोटीच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत.