भारतीय रेल्वेशी संबंधित कंपनी IRCTC Q3 Results जाहीर करण्यात आला आहे.
IRCTC ने जाहीर केलेल्या निकालांवर नजर टाकल्यास ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये निव्वळ नफा वार्षिक आधारावर 341 कोटी रुपये झाला आहे.
IRCTC च्या उत्पन्नातही मोठी वाढ झाली असून ती 10% वाढीसह 1,224.7 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
विशेष म्हणजे रेल्वेशी संबंधित या कंपनीने फक्त पाणी विकून तीन महिन्यांत 96 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे.
IRCTC ट्रेन आणि रेल्वे स्थानकांवर रेल नीर या ब्रँड नावाने पाणी विकते. मागील तीन महिन्यांमध्ये या व्यवसायातून 96 कोटी रुपये उत्पन्न मिळवले आहे.
तर गेल्या वर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये हा आकडा सुमारे 84 कोटी रुपये इतका होता.