खायला रुचकर आणि किंमत ही कमी असलेला हा वडा पाव महाराष्ट्रासोबत अनेक राज्यातील लोकांना आवडतो.
समोसा हा लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांचा आवडता स्ट्रीट फूड आहे. समोसांचे विविध प्रकार ही अनेक देशात प्रसिद्ध आहेत.
पाणीपुरी ही आपल्या देशात लोकप्रिय आहेच परंतु परदेशातील राजकारणी आणि नागरिकांना देखील ती खायला आवडते.
पनीरची भाजी असो किंवा चिकनचे डिशेस ती नान सोबत सर्व्ह केली जाते.नान मध्ये प्लेन, गार्लिक, बटर यासह अनेक प्रकार असतात.
हा आपल्या भारतीय आहाराचा एक भागच आहे.जो की घर असो किंवा रेस्टॉरंटमध्ये लोकांना खायला आवडतो.
भारतात पराठा हा लोकप्रिय पदार्थ आहे.बटाटा, मुळा, कोबी, चीज ,मेथी सारखे पराठ्याचे विविध प्रकार आहेत जे भारतीयांना खूप आवडतात.
चाट हा स्ट्रीट स्टाईल पदार्थ सर्वांना खायला आवडतो.यात टिक्की चाट ते बटाटा, कचोरी, समोसे इत्यादी अनेक प्रकारचे चाट खाल्ले जातात.
भेळपुरी हे एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे, जे आजच्या तरुणांना आवडते. भेळपुरी ही मुरमुरे,बटाटा,मिरचीचा ठेचा,शेव,शेगदाने,टोमॅटो,कांदा,चिंचेचं पाणी घालून तयार केली जाते.
राजस्थानातील लोक कचोरी सकाळी चहा सोबत असो किंवा संध्याकाळचा नाश्ता असो ते आवडीने खातात.बटाट्यापासून डाळीपर्यंत कचोरीच्या अनेक जाती उत्तर भारतात लोकप्रिय आहेत.
उत्तर भारतातील लोकांना हे स्ट्रीट फूड स्नॅक्स म्हणून खायला आवडते.काठी रोल्स व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पद्धतीचे बनवले जातात.
मंचुरियन ही एक चायनीज रेसिपी आहे, जी प्रत्येक चायनीज खाद्यपदार्थ खाणाऱ्या लोकांना आवडते. जास्त करून या स्ट्रीट स्टाईल पदार्थ्याची क्रेज ही लहान मुलांमध्ये दिसून येते.
मटर कुलचा हा फ्लॅट ब्रेडचा एक चवदार प्रकार आहे जो प्रत्येकाला खायला आवडतो. कुलचा हा बटाटा , पनीर या सारख्या अनेक प्रकारचा असतो.