न्यूझीलंडच्या संघातून खेळणाऱ्या भारतीय वंशाच्या रचिन रवींद्रने वर्ल्ड कप 2023 मध्ये आपल्या कामगिरीची छाप सोडली.
चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, सन रायझर्स हैदराबादसारखे संघ सलामीवीर म्हणून रचिन रवींद्रचा विचार करु शकतात.
24 वर्षीय रचीन एक उत्तम फिरकी गोलंदाजही आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला चांगली बोली मिळू शकते.
वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामना भारताकडून हिसकावून घेणाऱ्या ट्रॅव्हीस हेडला उत्तम बोली यंदाच्या आयपीएलमध्ये मिळू शकते.
कोलकाता नाईट रायडर्ससारखा संघ उत्तम सलामीवीराच्या शोधात असल्याने ते ट्रॅव्हीससाठी मोठी रक्कम मोजू शकतात.
वानिंदू हसरंगाला बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सने करारमुक्त केलं आहे. त्यामुळे तो लिलावासाठी उपलब्ध आहे.
चेन्नई, कोलकाता आणि गुजरातचा संघ वानिंदू हसरंगासाठी मोठी बोली लावण्याची दाट शक्यता आहे.
23 वर्षीय दक्षिण आफ्रिकन गोलंदाज जेराल्ड कोएत्झीसाठीही यंदाच्या आयपीएलमध्ये उत्तम संधी आहे. त्याने वर्ल्ड कप 2023 मध्ये 20 विकेट्स घेतल्यात.
केकेआर आणि सीएसकेसारखे संघ वेगवान गोलंदाजाच्या शोधात असल्याने ते जेराल्ड कोएत्झीवर मोठी बोली लावू शकतात.
जॉश हेजलवूड - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जॉशला करारमुक्त केल्याने तो लिलावामध्ये उपलब्ध असणार आहे.
प्रत्येक प्रमुख संघाला जॉश त्यांच्या टीममध्ये हवा आहे. यामध्ये चेन्नई, कोलकाता, दिल्ली आणि गुजरातचा समावेश असून ते जॉशवर मोठी बोली लावू शकतील.