Men Fitness Tips : अनेकदा आपण पाहिले असेल की लग्नानंतर पुरुषांचे शर्टच्या बटाणातून पोट बाहेर आलेले दिसते? तसेच वजन सतत वाढत जाते. साधारणत: लठ्ठपणा हा आजार म्हणून ओळखला जातो. मात्र, लग्नानंतर बऱ्याच पुरुषांचे पोट पुढे येते याबद्दल सर्व्हे केल्यानंतर पुढे आले आहे. त्यासाठी त्यांना त्यांच्या पत्नीने चविष्ट पदार्थ खाऊ घातल्यामुळे असे होऊ शकते. परंतु, यात गंमतीचा भाग सोडला तर पोट पुढे येणे किंवा वाढीची अनेक कारणे आहेत.
खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करण्यापासून ते अनियमित दिनचर्या, ऑफिस किंवा घरात सतत एकाच जागी बसूण राहाणे. तसेच कामाचा ताण यामुळे वजन वाढते.
जीवनशैली याला कारणीभूत आहे. बहुतेक पुरुष त्यांच्या जेवणासाठी आणि कपडे धुणे, घर साफ करणे इत्यादी वैयक्तिक कामांसाठी घरातील महिलांवर अवलंबून असतात. विशेषतः लग्न झाल्यानंतर. त्याचा बराचसा वेळ ऑफिसमध्ये बसून जातो.
लग्न झाल्यावर जवळ जवळ सगळ्याच गोष्टी अनेक पुरुषांना बसल्या जागी हातात मिळतात. त्यामुळे उठून किंवा उभे राहूनकाही शोधावं काही लागत नाही. तसेच त्यांचा व्यायाम कमी होतो.
आता आपले लग्न झाले आहे. आता कोणाला काही इम्प्रेस करायचे नाही, असा विचार करुन व्यायाम आणि आहार लक्ष दिले जात नाही. त्यामुळे पोटवाढीला निमंत्रण मिळते.
लग्न झाल्यानंतर पती आणि पतीमधील संबंध. समाधानाची भावना. रोज समाधान. जे काय म्हणतात ते हेच असावं, असा विचार होतो. या मुळे आनंदाने पोट भरते. आनंदामुळे भरपूर भुक लागते. त्यामुळे तो भरपूर जेवतो. याचा परिमाण हा ढेरीवाढीवर होतो.
लग्नानंतर अवघ्या एका वर्षातच 80 टक्के तरुणींची तब्येत सुधारते. पुरुषांच्या बाबतीत हे प्रमाण 40 ते 50 टक्के एवढे आहे. लग्नानंतर महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. त्याचाही परिणाम वजन वाढण्यावर होतो. तसेच पुरुषांच्याबाबतीत असते.
लग्न ठरल्यावर नातलग आणि मित्रमंडळी जेवायला बोलावतात. गोडधोड खाल्लं जाते. पंचपक्वान्नाचा बेत केला जातो. त्यामुळे खाण्यावर काहीही नियंत्रण राहत नाही आणि वजन वाढायला सुरुवात होते.
लग्नानंतर संपूर्ण आयुष्यच बदलून जाते.खाणपानाच्या सवयीही बदलून जातात. जेवण, नाश्ता यांच्या वेळाही बदललेल्या असतात. अधिक तेलकट आणि मसालेदार जेवण घेतले जाते. याचा आराेग्यावरही परिणाम होतो. एकीकडे जीवनशैलीत आणि आहारात झालेला बदल आणि दुसरीकडे व्यायामाच अभाव यामुळे लग्नानंतर तब्येत सुटत जाते.