तुमचा मोबाईल गरम होण्याचे मुख्य कारण हे मोबाईलचा अतिवापर आहे. अनेक लोक सतत मोबाईल वापरत असतात. आता मोबाईल हे यंत्र आहे, त्यालाही विश्रांती दिली पाहिजे.
सूर्यप्रकाशात बराच वेळ फोन वापरणे टाळा. कारच्या डॅशबोर्डमधून जिथून सूर्यप्रकाश येतो अशा जागीदेखील मोबाईल फोन ठेवणे टाळा
अनेक वेळा मोबाईलच्या कव्हरमुळे मोबाईल गरम होऊ लागतो. जर तुमचा मोबाईल सतत कव्हरमध्ये असेल तर गरम झाल्यावर त्याचे कव्हर काढून टाका.
तुमचा मोबाईल गरम होण्याचे कारण तुमच्या मोबाईलची ब्राइटनेस देखील असू शकतो. त्यामुळे स्मार्टफोनचा ब्राइटनेस कमी ठेवण्याचा प्रयत्न करा.
तुमचा मोबाईल गरम होण्याची समस्या इंटरनेट वापरामुळे देखील होऊ शकते. ज्या मोबाईलमध्ये रॅम कमी आहे त्यांना अशी समस्या येऊ असते. कारण इंटरनेट वापरताना रॅमचा वापर जास्त होतो.
मोबाईल गरम होण्याचे एक मोठे कारण त्यातील खराब बॅटरी देखील असू शकते. त्यामुळे फोन चार्ज करता तेव्हा चांगल्या दर्जाची चार्जिंग केबल वापरा.
धूळ ही फोन गरम होण्याचे मुख्य कारण बनू शकते. त्यामुळे फोन नेहमी स्वच्छ ठेवा. सॉफ्ट ब्रश आणि सुती कापडाचा वापर करुन फोन साफ करण्याचा प्रयत्न करा.
फोन गरम झाल्यानंतर काही भलतेच उपाय करणे टाळा. फ्रिजमध्ये ठेवून मोबाईल फोन थंड होणार नाही. त्यासाठी थोडा वेळ द्या.
तुमच्या मोबाईलचे सॉफ्टवेअर नेहमी अपडेट ठेवा. त्यामुळे मोबाईल जास्त गरम होणार नाही. (सर्व फोटो - freepik.com)