मकर संक्रांतीला तीळ का खातात?

तेजश्री गायकवाड
Jan 12,2025


मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून तिळाचे लाडू खाल्ले जातात. या दिवशी तीळ का खातात याचे कारण जाणून घ्या.


मकर संक्रांतीचा सण हिवाळ्यात येतो. त्यामुळे या सणात तीळ आणि गूळ यांसारख्या पदार्थ खाण्याला विशेष महत्त्व आहे,


कारण थंडीच्या काळात ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. चला जाणून घेऊया तीळ खाण्याचे फायदे.


तिळामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, जे पचन सुधारण्यास मदत करते. त्यामुळे बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.


तिळाच्या बियांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते, जे हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करतात.


तीळ खाण्याचे अनेक फायदे असले तरी ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्यालाही हानी पोहोचते.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story