चांगल्या सेक्स लाइफसाठी

नेमकं काय-काय खावं?

Oct 16,2023

डाळिंब

डाळिंबाचा रस प्यायल्याने मूड सुधारतो, रक्त प्रवाह सुधारतो आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढण्यास मदत होते. शिवाय लैंगिक शक्ती आणि प्रजनन क्षमता वाढण्यास मदत होते.

चॉकलेट

चॉकलेट खाल्ल्याने सेरोटोनिन हार्मोन निर्माण होता. ज्यामुळे तुमचा मूड चांगला होतो.

पालक

हिरव्या पालकामध्ये भरपूर मॅग्नेशियम असतं, जे टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढण्यास उपयुक्त ठरते. शिवाय पालकामधील आयर्नमुळे लैंगिक क्षमता वाढण्यास मदत होते.

टरबूज

टरबूजमध्ये सिट्रुलीन नावाचे अमिनो अॅसिड असतं. टरबूज खाल्ल्याने आर्जिनिन अमीनो ऍसिड तयार होतं. हे लैंगिक अवयवासाठी चांगल असतं.

एवोकॅडो

या क्रीमयुक्त फळामध्ये हेल्दी फॅट आणि फायबर असते. एवोकॅडो खाल्ल्याने तुम्हाला आतून ऊर्जा मिळते.

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे चिंता कमी होते आणि लैंगिक क्षमता वाढण्यास मदत होते. त्याशिवाय स्ट्रॉबेरी खाल्ल्याने शरीरात ऑक्सीटोसिन हार्मोन निर्माण होता. ज्याला लव्ह हार्मोन असंही म्हणतात.

कॉफी किंवा चहा

कॉफी आणि चहामध्ये भरपूर कॅफिन असते ज्यामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतो. यामुळे संबंधादरम्यान पुरुषांची परफॉर्मन्स चिंता दूर होण्यास मदत होते.

फॅटी फिश

सॅल्मन, सार्डिन आणि मॅकेरल यांसारख्या फॅटी माशांमध्ये ओमेगा-3 मुबलक प्रमाणात असतं. हे निरोगी चरबी शरीरातील जळजळ कमी करुन लैंगिक आरोग्य सुधारण्यास मदत करतं.

या गोष्टी टाळा

लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी दारू, मांस आणि लोणी यासारख्या संपृक्त चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळा(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

VIEW ALL

Read Next Story