सध्याच्या वाईट जीवनशैलीमुळे महिलांना मासिक पाळीदरम्यान खूप त्रास सहन करावा लागतो.
अशा परिस्थितीत, काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही मासिक पाळीच्या दरम्यानच्या वेदनापासून मुक्त होऊ शकता.
पोटाला गरम पाण्याच्या पिशवीने शेका. यामुळे खालच्या भागाच्या स्नायूंना आराम मिळतो. क्रॅम्प्स कमी करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे.
तात्काळ आराम मिळवण्यासाठी आल्याचे काही तुकडे एक कप पाण्यात उकळून दिवसातून तीन वेळा जेवणानंतर प्या.
मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी एक ग्लास दुधात अर्धा चमचा हळद टाकून उकळा. कोमट झाल्यावर ते प्या.
पोटदुखी खूप असेल तर अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा मीठ एकत्र करून कोमट पाण्यासोबत खाल्ल्यास लगेच आराम मिळतो.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)