'या' 3 प्रकारच्या सूपमुळे पूर्ण होईल मल्टीविटामिनची कमतरता

तेजश्री गायकवाड
Jan 22,2025


आपल्या आहारातील जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते.


अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात मल्टीविटामिन सूपचा समावेश करू शकता.

कॉर्न आणि पालक सूप

पालक आणि कॉर्न सूपमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के मुबलक प्रमाणात आढळते. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करतात.

बीटरूट आणि गाजर सूप

बीटरूट आणि गाजर सूप प्यायल्याने रक्ताभिसरणही वाढते. यामुळे जीवनसत्त्वाची कमतरता भासत नाही.

मुगाचे सूप

मूग डाळीमध्ये प्रथिने आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते. हे स्नायूंना बळकट करण्याचे काम करते. यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.


हे तीन सूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. हे प्यायल्याने सर्दीपासून बचाव होतो आणि मल्टीविटामिनची कमतरता देखील पूर्ण होते.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story