अनेकांना बसून पाणी पिण्याची सवय असते. तर काहींना उभं राहून पाणी पिण्याची सवय असते. पण ही सवय शरीराला आतून नुकसान करते.
उभे राहून पाणी प्यायल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो. इतकेच नाही तर योगासनांमध्ये असे मानले जाते की, उभे राहून पाणी पिण्याच्या प्रक्रियेचा शरीरावर नकारात्मक परिणाम होतो.
उभे राहून पाणी प्यायल्याने पोटात गॅस तयार होतो, पचनसंस्थेवर दबाव येतो आणि शरीरात पाण्याचे असंतुलन होते.
उभे राहून पाणी प्यायल्याने किडनीवर दबाव पडतो ज्यामुळे किडनीचे आजार वाढू शकतात. त्यामुळे किडनीच्या रुग्णांनी आरामात बसून पाणी प्यावे.
उभे राहून पाणी प्यायल्याने फुफ्फुसावर दाब पडतो ज्यामुळे फुफ्फुसे पूर्णपणे उघडू शकत नाहीत. त्यामुळे श्वसनसंस्थेवर परिणाम होतो.
जर एखाद्याला गुडघे, नितंब किंवा कंबरदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास असेल तर त्यांनी उभे राहून पाणी पिऊ नये.