अनेकदा रात्रीच्या उरलेल्या भाताचे सकाळी काय करायचे असा प्रश्न पडतो. एकतर फोडणीचा भात केला जातो किंवा मग दुपारी तोच भात खाल्ला जातो.
मात्र, रात्री उरलेल्या शिळ्या भातापासून तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी चटपटीत गुजराती रोटला बनवू शकता. गुजराती रोटलाची चटपटीत रेसिपी पाहा.
१ वाटी शिळा भात, १ वाटी कणीक, चवीनुसार मीठ, कांदा, २ हिरव्या मिरच्या, १ चमचा कोथिंबीर, १ टी-स्पून लाल मिरची पावडर, २ चमचे दही, १ टी-स्पून चाट मसाला, १ टी-स्पून गरम मसाला,
सगळ्यात पहिले एका भांड्यात शिळा भात, कणिक, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, दही, लाल मिरची, चाट मसाला, गरम मसाला आणि मीठ टाकून हे मिश्रण चांगले मळून घ्या.
त्यानंतर या पीठाचे छोटे छोटे गोळे करुन गोल लाटून घ्या. त्यानंतर मोठ्या आचेवर तवा ठेवून दोन्हीकडून व्यवस्थित भाजून घ्या.
रोटलला सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत व कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
उरलेल्या भातापासून चटपटीत रोटले तयार झाले आहेत. तुम्ही लोणचे किंवा दह्यासोबत हे रोटले खाऊ शकतात.