जाणकारांच्या मते दूध गरम किंव थंड केल्यास त्याचे गुमधर्म आणि परिणामही बदलतात.
तज्ज्ञांच्या मते रात्रीच्या वेळी थंड दूध पिणं फायद्याचं ठरतं. यामुळं पचनक्रिया सुधारते आणि झोपही चांगली लागले.
थंड दूध पचवणं कठीण असल्यामुळं या प्रक्रियेत शरीराला अधिक मेहनत घ्यावी लागते. ज्यामुंळं पोट नियंत्रणात राहून चरबी वाढत नाही.
ज्यांना रात्रीच्या वेळी आंबट, करपट ढेकर येण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी रात्रीच्या वेळी थंड दूध पिणं रामबाण उपाय.
अनिद्रेच्या समस्येचा सामना करणाऱ्यांसाठी थंड दूध फायदेशीर ठरतं. यामुळं डोळे जड होऊन झोप येऊ लागते.
हाडांना बळकटी देण्यासाठीसुद्धा थंड दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दुधातील फॉस्फरस आणि कॅल्शियम यांसारख्या घटकांमुळं हाडांना बळकटी मिळते.
(वरील माहिती सामान्य संदर्भ आणि ज्ञानाच्या आधारे देण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही. आहारविषयक बदलांपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )