शिळे अन्न खाणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. ताजे अन्न बनवल्यानंतर 12 तासांच्या आतच संपवले पाहिजे. शिळे अन्न खाल्ल्याने शरीरासाठी नुकसानदायक ठरु शकते.
अनेकदा आपण रात्री शिल्लक राहिलेली पोळी सकाळी किंवा दुपारी खातो. मात्र, शिळे अन्न खाल्ल्याने तुमची प्रकृती बिघडू शकते. त्यामुळं फूड पॉइझनिंगचा धोका उद्भवतो.
ज्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती कमजोर असते त्यांनी चुकूनही शिळी चपाती खाऊ नये. त्यातील हानिकारक बॅक्टिरियामुळं अनेक आजार होऊ शकतात.
शिळ्या चपातीवर बुरशी आणि बॅक्टेरिया निर्माण होतात. त्यामुळं अशा चपात्या खाल्ल्यास मळमळ, उलटीसारखे आजार होतात.
जर तुम्ही शिळ्या चपातीचे सेवन करता तेव्हा तुमची पाचनसंस्था कमजोर होते. त्यामुळं पचनासंबंधी आजाराचा सामना करावा लागतो.
शिळ्या चपातीवर बॅक्टेरियामुळं इन्फेक्शनचा धोका वाढतो. यामुळं घशात खवखव निर्माण होऊ शकते.
शिळी चपाती खाल्ल्याने अपचन होऊ शकते. त्यामुळं जास्त वेळ असलेली शिळी चपाती खाऊ नये
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)