चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तुम्ही आहारात पोषक गोष्टींचा समावेश करणंही तितकंच महत्त्वाचं.
चाळिशीनंतर त्वचा निस्तेज होऊ लागते, तिच्यावर सुरकुत्या येऊ लागतात आणि मग त्या कमी करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करता.
त्वचेच्या आरोग्यासाठी बरेचजण घरगुती उपायांवर अवलंबून असतात, तर काही मंडळी फेशियल, व्यायाम करून सुरकुत्या कमी करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये घरगुती उपचारांना जास्त वेळ लागू शकतो.
त्वचेच्या सौंदर्यासाठी आणि आरोग्यासाठी फिलर आणि फेशियलसारख्या उपचारांसाठी खूप पैसे खर्च केले जातात. पण, काही फळांचं सेवनही तुमची समस्या सहज दूर करु शकतात हे ठाऊक आहे का?
ब्लूबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स असतात, जे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. ब्लूबेरी खाल्ल्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ राहते आणि त्यावरील डाग कमी होतात.
डाळींब शरीरातील अँटिऑक्सिडंट्स आणि कोलेजन सारखे घटक वाढवण्यास मदत करते त्यामुळे त्याचे नियमीत सेवन करावे.
जीवनसत्त्वं आणि अँटिऑक्सिडंटने परिपूर्ण असणाऱ्या ॲव्होकाडोमुळं त्वचेला पोषण मिळून चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
किवीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे त्वचेमध्ये रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी होण्यास मदत होते.
संत्री व्हिटॅमिन सीचा एक चांगला स्त्रोत असून, कोलेजन उत्पादनासाठी आवश्यक आहे. त्यामुळं त्वचेचा पोत सुधारण्यास आणि सुरकुत्या कमी करण्यात मदत होते.
पपईमध्ये पपेन नावाचे एन्झाइम असते, त्यासोबतच व्हिटॅमिन ए, सी आणि ई असतात, जे त्वचाला छान बणवण्यास मदत करतं.