काही दिवसांनी उन्हाळा सुरु झाल्यानंतर प्रत्येक पंख्याचा स्पीड हा जास्त असणार आहे. मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात वीजबिल येते.
पण, पंख्याचा वेग कमी केल्यास वीज बिल कमी होते, असा सर्वसाधारण समज आहे. यासाठी लोक 5 ऐवजी 4 नंबरवर पंखा ठेवतात.
पंखा एक ते पाच या वेगाने धावतो. यामध्ये, तो क्रमांक एकवर सर्वात कमी आणि पाचव्या क्रमांकावर सर्वात वेगवान फिरतो. त्यामुळे लोकांना वाटतं की यामुळे विजबिलात फरक पडतो.
रेग्युलेटर कोणत्याही पंख्याचा वेग नियंत्रित करतो. म्हणजे तुमचा रेग्युलेटर कसा आणि कोणता आहे? यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात.
पण हे हे पंख्याच्या रेग्युलेटरच्या प्रकारावर अवलंबून असते. जर तुमचा रेग्युलेटर इलेक्ट्रिक रेग्युलेटर असेल तर तो फायरिंग अँगल बदलून करंटचा प्रवाह नियंत्रित करतो. यामुळे विजे खर्च वाचतो.
तर जुने रेग्युलेटर फॅनला दिलेला व्होल्टेज कमी करून त्याचा वेग कमी करत असत. पण, यामुळे विजेची बचत होत नाही. कारण हे रेग्युलेटर रेझिस्टर म्हणून काम करते आणि त्यात तेवढीच वीज वाया जाते.