'या' फुलांच्या चहानं मायग्रेनचा त्रास होईल छूमंतर
आजकालच्या चुकीच्या जेवणाच्या सवयी, तणाव, अनिद्रा आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे मायग्रेनची समस्या वाढत आहे.
आयुर्वैदात मायग्रेनसाठी खास एका फुलाचा चहा सांगितला आहे.
औषधांशिवाय अनेक नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय आहेत ज्याने मायग्रेनच्या डोकेदुखीपासून तुम्हाला आराम मिळेल.
मायग्रेनच्या रुग्णांसाठी गोकर्णाच्या फुलांपासून बनवलेला ब्लू टी मायग्रेनसाठी तसेच आरोग्यासाठी फायदेशीर असते.
या ब्लू टीमध्ये अँटिऑक्सिडेंट्सचं प्रमाण अधिक असल्याने मायग्रेनमुळे होणारी डोकेदुखी कमी करते.
रोज ब्लू टीचे सेवन केल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते, त्यामुळे वजन नियंत्रणात येतं.
पाण्यामध्ये गोकर्णाची फूलं घालून ते छान उकळवून घ्यावे त्यानंतर त्यात थोडा लिंबाचा रस आणि मध घालून या चहाचे सेवन करावे
हा चहा प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात येते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते
मेटाबोलिझम वाढवते त्यासोबत रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यासही या चहाचा फायदा मिळतो.(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)