यूरिक ऍसिडची समस्या आता सामान्य झाली असून अनेक लोकांना याचा सामना करावा लागतो.
युरिक ऍसिड वाढण्याचं कारण हे मुख्यत्व चुकीचा आहार आहे. शरीरात युरिक ऍसिड वाढलं की पायांना सूज येते आणि शरीरात तीव्र वेदना होतात.
युरिक ऍसिडचा त्रास अधिकतर हिवाळ्यामध्ये जास्त जाणवू लागतो. तेव्हा आहारात एका फळाचा समावेश केल्यास ही समस्या कंट्रोलमध्ये येऊ शकते.
युरिक ऍसिडने त्रस्त असलेले रुग्ण पपईचे सेवन करू शकतात. पपईत प्युरीनचे प्रमाण कमी असते.
अँटी इंफ्लेमेटरी गुण पपईत असल्याने ते खाल्ल्यामुळे आराम मिळतो.
पपईमध्ये पपेन एंजाइम असल्याने पचन यंत्रणा सुधारते आणि गॅस अपचन सारख्या समस्या दूर होतात.
अँटी ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असल्याने पपईच्या सेवनाने त्वचा चांगली बनते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)