सध्या मराठी नाटकंही तूफान गाजताना दिसत आहेत. तेव्हा ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात काही नाटकं प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत.
यावेळी प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या नव्याकोऱ्या नाटकाची चर्चा आहे.
'नवा गडी नवं राज्य'नंतर त्यांचे 'जर तरची गोष्ट' हे नाटकं प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.
5 ऑगस्टला या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. दिनानाथ मंगशेकर नाट्यगृहात हा प्रयोग होईल.
अनिता दाते, पुष्करराज चिरपुटकर आणि सागर देशमुख यांचे 'किरकोळ नवरे' हे नाटक प्रदर्शित होतं आहे.
या नाटकाचा प्रयोग 11 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याचसोबतच ब्रॅण्ड अॅबेसिडर, चाणक्य अशीही दोन नाटकं प्रदर्शित होणार आहेत.