अंजीर खाऊ नये! होईल पश्चाताप
हेल्दी फूडमध्ये ड्रायफ्रुट्स हे निरोगी राहण्यासाठी अनेक जण खातात. यातील बदाम, मनुका, काजू, अंजीर असं ड्रायफ्रुट्स आपण खातो.
अंजीरमधील गुणधर्मांमुळे अनेक आरोग्यापासून मुक्तता मिळते.
अंजीरचं सेवन केल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि बद्धकोष्ठता, गॅस सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
मात्र काही लोकांनी चुकूनही खाऊ नयेत. अति अंजीराचं सेवन केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतात.
तुम्हाला पित्ताशयाशी संबंधित समस्या असतील तर तुम्ही अंजीरचे सेवन करु नये.
अंजीरमधील ऑक्सलेट शरीरात क्रिस्टल्सच्या रुपात जमा होते. त्यामुळे किडनी समस्या असणाऱ्या लोकांनी अंजीर खाऊ नये.
काही लोकांना अंजीरची अॅलर्जी असते, त्यांनी अंजीरचं सेवन चुकूनही करु नयेत. या लोकांना गंभीर आजाराच्या समस्या होऊ शकता.
जे लोक अंजीरचे भरपूर सेवन करतात, त्यांना डायरियाची समस्या होऊ शकते. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)