कपिल शर्माच्या करिअरची सुरूवात स्टँड-अप कॉमेडीपासून झाली होती. यानंतर त्याने टी.व्ही शोमध्ये काम केले, तसेच बऱ्याच हिट चित्रपटात अभिनेता म्हणून काम केले.
कॉमेडियन हर्ष गुजराल आता अभिनेता म्हणून 'मेरे हसबैंड की बीवी' या चित्रपटातून डेब्यू केला. हा चित्रपट प्रदर्शित झाला असून बरेच स्टार्स मुख्य भूमिकेत आहेत.
कॉमेडियन हर्ष बेनिवालदेखील अभिनेता बनला आहे. त्याने 'स्टूडेंट ऑफ द ईयर 2' या चित्रपटातून डेब्यू केला होता. या चित्रपटात टायगर श्रॉफ प्रमुख भूमिकेत होता.
प्रसिद्ध कॉमेडियन आणि शायर जाकिर खानदेखील अभिनयापासून दूर नाही. जाकिरने 'चाचा विधायक है हमारे' या सीरीजमध्ये काम केले आहे.
कॉमेडियन आणि युट्यूबर भुवन बामने अभिनेता म्हणूनदेखील काम केले आहे. 'बीबी की वाइन्स' या शोमधून त्याने लोकांना हसवण्यास सुरूवात केली आणि नंतर 'ताजा खबर' या सीरीजमध्ये काम केले.
प्रसिद्ध युट्यूबर आणि कॉमेडियन अनुभव सिंग यानेदेखील अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्याने मै झूठी तू मक्कार' या चित्रपटातून डेब्यू केला.
आकाश गुप्तानेसुद्धा कॉमेडियन म्हणून खूप लोकप्रियता मिळवली. आकाशने 'कपल गोल्स' या हिट टी.व्ही सीरीजमध्ये काम केले आहे.
युट्यूबर आणि कॉमेडियनसोबत डॉली सिंग अभिनेत्रीदेखील बनली. 'डबल एक्स एल' आणि 'थँक्यू फॉर कमिंग' या चित्रपटात तसेच 'मॉडर्न लव्ह मुंबई' या टी.व्ही सीरीजमध्ये काम केले आहे.
युट्यूबर आणि कॉमेडियन कुशा कपिलासुद्धा चित्रपटात झळकली. तिने 'सुखी' तसेच 'थँक्यू फॉर कमिंग' यासारख्या चित्रपटात काम केले आहे.
2015 मध्ये प्राजक्ता कोळीने कॉमेडी जगतात पदार्पण केले आणि युट्यूब व्हिडीओ बनवण्यास सुरूवात केली. यानंतर तिने काही चित्रपटातसुद्धा काम केले आहे.