शाहरुखसोबत नेहमी सावलीप्रमाणे असणारी 'ती' महिला कोण? करोडोंची आहे मालकीण

Nov 02,2023

शाहरुख खानचा आज 58 वा वाढदिवस आहे. पण यादिवशी आणखी एका व्यक्तीचा वाढदिवस आहे.

ही व्यक्ती म्हणजे शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आहे. पूजा 11 वर्षांपासून शाहरुख खानसोबत आहे. पूजाचा वाढदिवस 2 नोव्हेंबरला असतो.

पूजा शाहरुख खानसह त्याची प्रोडक्शन कंपनी Red Chillies Entertainment चीही काळजी घेते.

2012 मध्ये पूजाने शाहरुखसह काम करण्यास सुरुवात केली होती. शाहरुख इंस्टाग्रामवर फक्त 6 लोकांना फॉलो करत असून, त्यात पूजा ददलानीदेखील आहे.

फराह खानने पूजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून, ओम शांती ओमच्या सेटवर पहिल्यांदा भेट झाली तेव्हा 23 वर्षांची होती असं सांगितलं आहे.

पूजा आता 39 वर्षांची असून शाहरुखच्या कुटुंबाचाच भाग झाली आहे. कायदेशीर अडचणींमध्येही पूजा शाहरुखच्या पाठीशी असते.

पूजा विवाहित असून तिचा पती हितेश गुर्नानी एक व्यावसायिक आहे. त्यांना रेना नावाची एक मुलगी आहे.

एका रिपोर्टनुसार, पूजाला शाहरुखकडून 7 ते 9 कोटी पगार मिळतो.

पूजाची करोडोंची संपत्ती आहे. मुंबईतील वांद्रे येथे तिचं आलिशान घर आहे. गौरी खानने हे घर डिझाइन केलं आहे.

VIEW ALL

Read Next Story