दुसऱ्या बॉलवर बोल्ड झाल्यानंतरही रोहित ठरला पहिला भारतीय ज्याने...

Swapnil Ghangale
Nov 02,2023

दुसऱ्याच चेंडूवर क्लिन बोल्ड

भारत आणि श्रीलंकेदरम्यान मुंबईतील वानखेडे मैदानातील सामन्यामध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्याच चेंडूवर क्लिन बोल्ड झाला.

रोहित आणि गिल फलंदाजीसाठी आले

श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघातील सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल फलंदाजीसाठी मैदानात उतरले.

दमदार कामगिरीची अपेक्षा

होम ग्राऊण्ड असल्याने रोहित शर्मा दमदार कामगिरी करेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती.

एकच जल्लोष

रोहितने दिलशान मधुशंकाच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूला चौकार लगावला आणि वानखेडेच्या मैदानात एकच जल्लोष झाला.

रोहित क्लिन बोल्ड

रोहित आता मोठी खेळी करणार असं वाटत असतानाच सामन्यातील दुसऱ्या चेंडूवर रोहित क्लिन बोल्ड झाला.

पत्नीला बसला धक्का

रोहित अशापद्धतीने अनपेक्षितरित्या बोल्ड झाल्याने त्याची पत्नी ऋतिकालाही मोठा धक्का बसला.

ऋतिकाला बसला धक्का

रोहित बोल्ड झाल्यानंतर ऋतिकाच्या चेहऱ्यावरील हावभाव अगदीच थक्क करणारे होते.

2 चेंडूसाठी मैदानात होता तरी...

रोहित शर्मा केवळ 2 चेंडूसाठी मैदानात होता तरी त्याने चौकार लगावत वर्ल्ड कप 2023 मध्ये वैयक्तिक स्तरावर 400 धावांचा टप्पा गाठला.

टॉप 5 यादी रोहित

रोहित हा सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या टॉप 5 यादीमध्ये आहे.

रोहित पहिला भारतीय

मात्र 400 धावांचा टप्पा ओलांडणारा वर्ल्ड कप 2023 मधील रोहित हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. 4 धावा करुन बाद झाल्याने रोहितच्या नावावर आता 402 धावा आहेत.

VIEW ALL

Read Next Story