माजी मंत्री गणेश नाईक भाजपच्या वाटेवर, राष्ट्रवादीला हादरा?
नवी मुंबई : नवी मुंबईत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नाईक कुटुंबाला पराभवाचा सामना करावा लागला. आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर पकडू लागलीय.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आज बैठक बोलवली होती. या बैठकीला माजी खासदार संजीव नाईक आणि आमदार संदीप नाईक उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी गणेश नाईक जातील त्या पक्षात जाण्याची तयारी दाखवत, गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
प्रवाहाबरोबर राहण्याची आज गरज असल्याची भावना व्यक्त करत गणेश नाईक यांनी पक्ष बदलाचा निर्णय घ्यावा, अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे गणेश नाईक भाजपमध्ये गेले तर राष्ट्रवादीला मोठा हादरा बसेल, अशी चर्चा सुरु आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
गणेश नाईक भाजपच्या वाटेवर, राष्ट्रवादीला हादरा?
