पुण्याची टीम झाली आणखी शक्तीशाली

मुंबई: आयपीएलची पुण्याची टीम रायसिंग पुणे सुपरजायंट्सनं आपली टीम आणखी शक्तीशाली बनवली आहे. या टीमनं भारताचा डावखुरा बॅट्समन सौरभ तिवारी आणि दक्षिण आफ्रिकेचा ऑल राऊंडर ऍल्बी मॉर्कलला आपल्या टीममध्ये घेतलं आहे. 

सौरभ तिवारी आणि ऍल्बी मॉर्कल हे दोन्ही खेळाडू आयपीएलच्या मागच्या सिझनमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळले होते. पण 9 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या यंदाच्या सिझनमध्ये मात्र ते पुण्याकडून खेळतील.

मागच्याच आठवड्यात झालेल्या लिलावामध्ये पुण्याच्या टीमनं केव्हिन पीटरसन, मिचेल मार्शना विकत घेतलं होतं, तर आयपीएल प्लेअर ड्राफ्टमधून धोनी, अश्विन, अजिंक्य रहाणे हे तगडे शिलेदार पुण्याला मिळाले.

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
IPL pune team bought albie morkel and saurabh tiwari
News Source: 
Home Title: 

पुण्याची टीम झाली आणखी शक्तीशाली

पुण्याची टीम झाली आणखी शक्तीशाली
Yes
No