आदिवसी मंत्र्यांच्याच जिल्ह्यात 50 टक्के मुलं कुपोषित

कपिल राऊत, झी मीडिया, जव्हार : आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या पालघर जिल्ह्यातच 50 टक्के मुलं कुपोषित असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. अशा परिस्थितीत आदिवासींना सावरणार तरी कोण, असा प्रश्न उपस्थित होतोय.

'दिव्याखाली अंधार' म्हणतात, तो हाच... आदिवासींच्या समस्या सोडवण्यासाठी, कुपोषणावर मात करण्यासाठी सरकार करोडो रूपयांचा निधी खर्च करतं. मात्र, हा करोडोंचा निधी जातो तरी कुठे? असा प्रश्न निर्माण झालाय... कारण एकट्या जव्हार तालुक्यातच 2 हजार 26 बालके तीव्र कुपोषित असल्याची धक्कादायक आकडेवारी सरकारी अधिका-यांनी दिलीय.

जव्हारची लोकसंख्या पावणे दोन लाख एवढी असून, त्यात जवळपास पाचशे आदिवासी पाडे आहेत. भातशेतीशिवाय दुसरं रोजगाराचं साधन नाही. मुलांना दोन वेळचं जेवण खाऊ घायचं असेल तर नवरा-बायको दोघांनाही मोलमजुरी करावी लागते. त्यामुळं घरातल्या लहान मुलांच्या पोषणाकडं दुर्लक्ष होतं.

कुपोषित मुलांसाठी अंगणवाडीत पौष्टिक आहार दिला जातो तो खिचडीचा... ही खिचडी कधी कच्ची, तर कधी तिखट असते. त्यामुळं लहान मुलं ती खात नाहीत, अशी पालकांची तक्रार आहे.

दारिद्र्य, बेरोजगारी आणि पौष्टिक आहाराचा अभाव ही कुपोषणाची प्रमुख कारणं आहेत. आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या जिल्ह्यातच ही परिस्थिती असेल, तर संपूर्ण महाराष्ट्राबाबत न बोललेलंच बरं... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
50 percent of children facing malnutrition in palghar
News Source: 
Home Title: 

आदिवसी मंत्र्यांच्याच जिल्ह्यात 50 टक्के मुलं कुपोषित 

आदिवसी मंत्र्यांच्याच जिल्ह्यात 50 टक्के मुलं कुपोषित
Yes
No