बडोले यांच्या मुलीनं राज्य सरकारची शिष्यवृत्ती नाकारली

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोलेंच्या मुलीनं परदेशी शिक्षणासाठी राज्य सरकारनं दिलेली शिष्यवृत्ती नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. बडोलेंनी आपल्याच खात्याच्या योजनेचा लाभ मुलीला मिळवून दिला होता. झी मीडियाने ही बाब उघडकीस आणल्यानंतर बडोलेंना उपरती झाली आहे.

सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांच्या मुलालाही ही शिष्यवृत्ती मिळाली आहे. बडोलेंनी शिष्यवृत्ती नाकरल्यावर आता वाघमारे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
State government scholarships rejected by daughter of rajkumar Badolay
News Source: 
Home Title: 

बडोले यांच्या मुलीनं राज्य सरकारची शिष्यवृत्ती नाकारली

बडोले यांच्या मुलीनं राज्य सरकारची शिष्यवृत्ती नाकारली
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes