बाईकचा राऊंड न दिल्याने लावली मित्राच्या बाईकला आग

मुंबई : नवीकोरी बाईक चालवायला न दिल्याने मित्राचीच बाईक जाळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंबईतील कांदिवलीतील समता नगरमध्ये हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक चौकशी सुरू आहे. 

बाईकचा राऊंड

प्रदीप शर्मा या युवकाने नवी बाईक खरेदी केली. आपला मित्र पवन (१७) याला ही बाईक दाखवली. त्यावेळी बाईकवर एक राऊंड मारण्याची इच्छा पवनने व्यक्त केली.

पण प्रदीप शर्माने बाईक देण्यास नकार दिला. याचा राग पवनने मनात धरला. तसेच तुझी बाईक पेटवून देईन अशी धमकीही दिली. 

आग लावली 

रात्री बारानंतर पवनने गाडीवर पेट्रोल ओतून तिला आग लावली. थोड्यावेळाने सर्वांच्या हा प्रकार लक्षात आला. पण तेव्हा खूप उशीर झाला होता. 

बाल सुधार गृहात रवानगी 

पवनला पोलिसांनी अटक केली असून त्याची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Friend's bike was burnt because Not giving a bike ride
News Source: 
Home Title: 

बाईकचा राऊंड न दिल्याने लावली मित्राच्या बाईकला आग

बाईकचा राऊंड न दिल्याने लावली मित्राच्या बाईकला आग
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes