कोकण पदवीधर मतदारसंघात सेनेला जोरदार धक्का
मुंबई : विधान परिषद निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरे यांनी विजय मिळवला आहे. निरंजन डावखरे यांना ८१२७ मतांच्या आघाडीने विजयी झाली. ही निवडणुक भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेनेही प्रतिष्ठेची बनवली होती.
नाशकात सेना विजयी
विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीत शिवसेनेचे किशोर दराडे विजयी झाले आहेत. या निवडणुकीत किशोर दराडे यांना २४ हजार ३६९ मते मिळाली. तर संदीप बेडसे यांना तेरा हजार ८३० मते मिळाली . काही दिवसांपुर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने बाजी मारली होती आणि आता शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील विजयाने शिवसेनेला बळ मिळालं आहे.
कपिल पाटीलांची हॅट्रीक
विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघातून लोकभारतीचे कपिल पाटील यांनी लागोपाठ तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेनेचे शिवाजी शेंडगे आणि भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार अनिल देशमुख यांचा पराभव केला.
कोकण पदवीधर मतदारसंघात सेनेला जोरदार धक्का
