मुंबईत घर खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर, सिडको घरांची सोडत पुढील महिन्यात

नवी मुंबई :  CIDCO Lottery : आता जर तुम्ही घर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध होत आहे. सिडकोच्या पाच हजार घरांची सोडत 15 जानेवारीला निघणार आहे. (CIDCO to launch 5,000 housing flats as New Year offer in 5 prime locations in Navi Mumbai)

सिडको पाच हजार नवीन घरांची सोडत काढणार आहे. ही सोडत 15 ते 26 जानेवारी दरम्यान काढली जाणार असल्याचे समजत आहे. महागृहनिर्मितीत सिडकोचे कोटयवधी रुपये अडकल्याने लवकरात लवकर तयार घरे तसेच यापूर्वी शिल्लक राहिलेली 900 घरांची विक्री पुढील वर्षांच्या प्रारंभी सुरू केली जाणार आहे. यामुळे सिडकोच्या तिजोरीत भर पडणार आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन वर्षांतील 5 हजार घरांची नुकतीच घोषणा केली होती. नवीन वर्षाच्या प्रारंभी सिडको 5,000 फ्लॅट्ससह गृहनिर्माण योजना सादर करणार आहे. या सदनिका नवी मुंबईतील घणसोली, द्रोणागिरी, खारघर, कळंबोली आणि तळोजा या पाच प्रमुख ठिकाणी असतील, ज्यामुळे रहिवाशांना अनेक सुविधा आणि उत्तम कनेक्टिव्हिटी मिळेल. सिडको नवी मुंबईतील 5 प्राइम लोकेशन्समध्ये नवीन वर्षाची ऑफर म्हणून 5,000 सदनिका लॉन्च करणार आहे.

EWS श्रेणीतील सहभागी लाभार्थ्यांना ₹1.5 लाखाचे केंद्रीय सहाय्य आणि ₹1L राज्य सहाय्य मिळण्याचा हक्क आहे, तर LIG लाभार्थी ₹2.67L पर्यंत कर्ज सबसिडीचा लाभ घेऊ शकतात.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
CIDCO to launch 5,000 housing flats as New Year offer in Navi Mumbai
News Source: 
Home Title: 

मुंबईत घर खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर, सिडको घरांची सोडत पुढील महिन्यात

मुंबईत घर खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर, सिडको घरांची सोडत पुढील महिन्यात
Caption: 
संग्रहित छाया
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Highlights: 

सिडकोकडून 5 हजार नवीन घरांची सोडत 

15 ते 26 जानेवारीदरम्यान नव्या घरांची सोडत

नवी मुंबईत घर खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर 

Mobile Title: 
मुंबईत घर खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर, सिडको घरांची सोडत पुढील महिन्यात
Publish Later: 
No
Publish At: 
Wednesday, December 22, 2021 - 08:16
Request Count: 
1
Is Breaking News: 
No