'बिफ खायचंय त्यांनी खा, किस करायचा तर करा, फेस्टिवल कशाला?'
नवी दिल्ली : ज्यांना बिफ खायचं आहे त्यांनी बिफ खा. ज्यांना किस करायचं आहे त्यांनी किस करा, पण याचा फेस्टिवल आयोजित करण्याची काय गरज आहे? असा सवाल उपराष्ट्रपती वैंकया नायडू यांनी उपस्थित केला आहे. अफजल गुरुच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. लोकं अफजल गुरुच्या नावाच जप करत आहेत. हे काय चाललंल आहे? अफजल गुरुनं संसदेवर हल्ला केला होता, असं वक्तव्य नायडूंनी केलं आहे.
'जात-धर्म असूनही भारत एक'
आपल्याला भारतीय असण्यावर अभिमान असला पाहिजे. जात, धर्म, संपद्रायाच्या आधारावर विचार करणं सोडलं पाहिजे. लोकं जेव्हा विभाजन करायला सुरुवात करतात तेव्हा देशात समस्या सुरु होते, असं नायडू म्हणाले आहेत.
नायडू याआधीही बीफवर बोलले होते
मी स्वत: मांसहारी आहे. अन्न हे प्रत्येक व्यक्तीच्या आवड-निवडीवर अवलंबून असलेली वैयक्तिक गोष्ट आहे. भाजपला कोणालाही शाकाहरी बनवायचं नाही. कोणी काय खावं या प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. काही जण उगाच या प्रश्नावर राजकारण करत असल्याचं नायडू मागच्या वर्षी जूनमध्ये म्हणाले होते.
'बिफ खायचंय त्यांनी खा, किस करायचा तर करा, फेस्टिवल कशाला?'

'बीफ खायचं तर खा'
'किस करायचं तर करा'
या गोष्टींचा फेस्टिवल का- नायडू