सासूचे 'तसे' कृत्य पाहून नवरदेवाला बसला धक्का, लग्नमंडपातच घेतला टोकाचा निर्णय

Wedding News: लग्न म्हटलं की डीजे, नाचं, गाणं, धिंगाणा आला. पण हेच सेलिब्रेशन एक संसार मोडण्यास कारणीभूत ठरलंय. लग्नाच्या वरातीत डान्स केल्याने तसेच सिगारेट प्यायल्याने एका महिलेला आपल्या मुलीचा संसार सुरु होण्याआधीच मोडताना पाहावा लागला. उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात ही घटना घडल्याचे वृत्त आहे. 

आपल्या भावी सासूला धूम्रपान करताना आणि डीजे संगीतावर नाचताना पाहून एका वराने लग्नाच्या मंडपात आपले लग्न रद्द केले आहे. सरयात्रीन येथे राहणाऱ्या तरुणाचे लग्न राजपुरा येथील एका तरुणीसोबत झाले. यानंतर होणारा ओटभरणीचा सोहळा आणि इतर विवाह विधी पार पडले. या दोघांचे लग्न मंगळवार 27 जून रोजी निश्चित झाले होते. एका मंदिरात हे लग्न होणार होते. लग्नाच्या दिवशी वऱ्हाडी लग्न ठरलेल्या मंदिरात पोहोचले.

लग्नासाठी मंदिरात पोहोचल्यावर वराला समोर जे घडतंय ते पाहून आश्चर्याचा धक्का बसला. मंदिरात पोहोचल्यानंतर वऱ्हाडी मंडपात लग्न विधी होण्याची वाट पाहत होते. वाट पाहत असताना, त्याची सासू सिगारेट ओढताना आणि डीजे संगीताच्या तालावर नाचताना त्याने पाहिले. हे पाहून नवरा क्षणभरासाठी स्तब्ध झाला. त्याला सासूचे हे कृत्य अजिबात आवडले नाही. 

यानंतर दोन्ही कुटुंबात टोकाच वाद झाला. यानंतर लग्न रद्द करण्यात करण्याच्या टोकाच्या निर्णयापर्यंत नवरदेव पोहोचला. तो आपल्यासोबत आलेल्या वऱ्हाडाला घेऊन माघारी परतला. त्यानंतर मुलगी देखील आपल्या आईला घेऊन घरी परतली.

सासूला धुम्रपान करताना पाहून बसला धक्का 

भावी सासूला सिगारेट पिताना पाहणं नवरदेवा अजिबात रुचलं नव्हतं. त्यानंतर जेव्हा सासू डीजेवर नाचू लागली तेव्हा तर आणखी आश्चर्य वाटलं. त्याला हे सर्व अजिबात आवडले नाही. यादरम्यान वधू आणि वरात बराच वेळ वाद सुरू होता. शेवटी वराने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि नंतर लग्नाला नकार देत मिरवणुकीने परत गेली. वधूच्या हातावरील मेंदीचा रंग उडाला आणि आनंदाचे वातावरण निराशेमध्ये बदलले. गावात आजूबाजूचे लोक या घडलेल्या प्रकरणाची चर्चा करीत आहेत. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Groom got angry after seeing the mother in law smoking Canclled married
News Source: 
Home Title: 

सासूचे 'तसे' कृत्य पाहून नवरदेवाला बसला धक्का, लग्नमंडपातच घेतला टोकाचा निर्णय 

सासूचे 'तसे' कृत्य पाहून नवरदेवाला बसला धक्का, लग्नमंडपातच घेतला टोकाचा निर्णय
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
Pravin Dabholkar
Mobile Title: 
सासूचे 'तसे' कृत्य पाहून नवरदेवाला बसला धक्का, लग्नमंडपातच घेतला टोकाचा निर्णय
Publish Later: 
No
Publish At: 
Monday, July 3, 2023 - 14:45
Created By: 
Pravin Dabholkar
Updated By: 
Pravin Dabholkar
Published By: 
Pravin Dabholkar
Request Count: 
1
Is Breaking News: 
No
Word Count: 
255