राजपाल यादव यांची प्रेमाचा किस्सा माहितीय...सर्व शक्यता कल्पनेच्या पलिकडे आहे

मुंबई : या अभिनेत्याला पूर्वीइतके चित्रपट मिळाले नाहीत, पण तरीही ते इतके मोठे नाव आहे की त्याची मागणी इंडस्ट्रीत कधीही कमी होऊ शकत नाही. दरवर्षी तो चित्रपटांमध्ये दिसतो आणि लोकांना खूप हसवतो. 2021 मध्ये अभिनेत्याकडे 2 चित्रपट आहेत. तो हंगामा 2 आणि टाइम टू डान्ससारख्या चित्रपटात दिसणार आहे. आता आपण अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याकडे जाऊ या.

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर अभिनेत्याची लव्ह स्टोरीही कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. 2003 साली जेव्हा राजपाल यादवला चांगली भूमिका मिळू लागली, तेव्हा त्याला शूटिंगसाठी परदेशात जाण्याची संधीही मिळाली. 

2003 मध्ये तो सनी देओलच्या ‘हीरो’ चित्रपटाच्या शूटिंगच्या संदर्भात कॅनडाला गेला होता. जिथे त्याला राधा भेटली. तो तिथे फक्त 10 दिवस राहिला, परंतु या 10 दिवसात त्याला जीवनसाथी देखील मिळाली.

एका मुलाखतीत राधाने राजपाल यादव बद्दल सांगितले होते- राजपाल येथे 10 दिवसांसाठी होता पण त्यांना पाहिल्यावर मला वाटलं की मी त्याला 10 वर्षांपासून ओळखतो. राधाबद्दल बोलतांना राजपाल यादव म्हणाले की- मी जेव्हा कॅनडामध्ये होतो तेव्हा मला कॅल्गरीच्या कॉफी शॉपमध्ये राधा भेटत असे. 

यावेळी आम्ही आमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाबद्दल चर्चा करायचो. आम्ही सर्व गोष्टींबद्दल मोकळेपणाने बोलायचो. त्या 10 दिवसांमध्ये, आम्ही आपल्या आयुष्याच्या सर्व गोष्टीवर बोललो.

राधाने लग्नाविषयी सांगितले होते की, आम्हाला दोघांनाही लग्न करायचे होते. परंतु आम्ही आमचा सर्व वेळ एकमेकांना जाणून घेण्यासाठी घेतला. आम्ही आमच्या आयुष्याच्या प्राथमिकतेबद्दल बोललो. आम्ही दोघांनीही या नात्या संदर्भात आपल्या भावी शक्यतांबद्दल अतिशय विचार केला. जरी मी पाश्चिमात्य संस्कृतीत  राहत असली तरी मी अगदी पारंपरिक होते. यामुळे, लग्नानंतर मी जेव्हा भारतात आली, तेव्हा मला इथली संस्कृती अवलंबवायला अधिक वेळ लागला नाही.

राजपाल यादव आणि राधा यांचे 2003 साली लग्न झाले. त्यांना 2 मुलीही आहेत. राजपाल आपल्या कुटुंबियांसह सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात. विशेषत: ते त्यांच्या मुलींसोबतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
rajpal yadav love story and his married life
News Source: 
Home Title: 

 राजपाल यादव यांची प्रेमाचा किस्सा माहितीय...सर्व शक्यता कल्पनेच्या पलिकडे आहे

 राजपाल यादव यांची प्रेमाचा किस्सा माहितीय...सर्व शक्यता कल्पनेच्या पलिकडे आहे
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
राजपाल यादव यांची प्रेमाचा किस्सा माहितीय...सर्व शक्यता कल्पनेच्या पलिकडे आहे
Publish Later: 
No
Publish At: 
Tuesday, March 16, 2021 - 19:17
Request Count: 
1
Is Breaking News: 
No