सेलिब्रिटीचा एक बाटली घाम, 40 हजार रुपये देऊन विकत घेतात फॅन्स...
Viral News : पैसे कमवण्यासाठी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो? ही बातमी वाचून कदाचित तुम्हाला शॉक बसेल किंवा तुम्हाला प्रचंड किळस देखील येऊ शकते. कारण एका टीव्ही अभिनेत्रीने स्वतःचा घाम विकून पैसे कमावण्यास सुरुवात केली आहे. होय! एका रियालिटी टीव्ही शो स्टारने पैसे कमवण्यासाठी एक वेगळीच युक्ती लढवलीये. ती स्वतःचा घाम एका बाटलीत जमा करते आणि तो विकून ती लाखो रुपये कमवते.
31 वर्षीय स्टेफनी विकते घाम
31 वर्षीय स्टार स्टेफनी मॅटो ने स्वतःच्या व्यवसायाबाबत माहिती दिली. उन्हाळ्यात सर्वांनाच प्रचंड घाम घेतो, पण मला आलेला घाम मी बाटलीत गोळा करते आणि ती विकते असं तिचं म्हणणं आहे.
15 मिनिटं ऊन आणि 1 बाटली घाम
स्टेफनी अमेरिकेतल्या कनेक्टिकटमध्ये रहाते. ती एक घामाची बाटली तब्बल चाळीस हजार रुपयांना विकते. बरं तिचा असाही दावा आहे की यातून दररोज ती चार लाख रुपये कमवते.
स्टेफनीचे ग्राहक म्हणतात...
स्टेफनी म्हणते, तिला स्विमिंग पूलजवळ बसायला प्रचंड आवडतं. मात्र त्यालाही प्रचंड मेहनत असल्याचंही ती सांगते. लोकं तिचा घाम का विकत घेतात याबद्दलही तीने सांगितलंय. त्या घामाच्या सुंगधामुळे मी त्यांच्या जवळ असल्याचा भास त्या व्यक्तीला होतो, त्यामुळे अनेकजण स्टेफनीच्या घामाच्या बाटल्या विकत घेतात.
स्वतःला हायड्रेटेड ठेवणं महत्त्वाचं
स्टेफनी पुढे म्हणते, घाम गोळा करण्याच्या प्रक्रियेदरम्यान ती स्वतःला कायम हायड्रेटेड ठेवते. स्वतःला हायड्रेटेड ठेवल्याने जास्त घाम येण्यास मदत होते. या रियालिटी शो स्टारला हेही ठाऊक आहे की कायम उन्हात बसल्याने तिला आरोग्य संबंधी त्रास होऊ शकतो. ती यासाठी खास साधगीरीही बाळगते.
अतरंगी स्टेफनी..
बरं अशी अतरंगी गोष्ट करण्याची तिची ही पहिली वेळ नाही. याआधीही तिने विविध अतरंगी गोष्टी केल्याने पब्लिसिटी मिळवली होती. स्टेफनी म्हणते की तिला स्मार्ट व्हायचंय. स्टेफनीने तिच्या या व्यवसायाबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
सेलिब्रिटीचा एक बाटली घाम, 40 हजार रुपये देऊन विकत घेतात फॅन्स...
