Crime : एका तरुणीवर 100 जणांनी 44 दिवस 400 वेळा केला बलात्कार! धक्कादायकरित्या उघडकीस आले सर्व प्रकरण

44 दिवस कैद करत 400 जणांनी बलात्कार केला. नग्न ठेवले, झुरळ खायला लावले, मुत्र प्यायला भाग पाडले. जगातील सर्वात धक्कादायक बलात्कार प्रकरणची  माहिती गुगलवरही  मिळते. हे प्रकरण वाचून डोके सुन्न होईल.   

वनिता कांबळे | Updated: Feb 26, 2025, 08:09 PM IST
Crime : एका तरुणीवर 100 जणांनी 44 दिवस 400 वेळा केला बलात्कार! धक्कादायकरित्या उघडकीस आले सर्व प्रकरण

Junko Furuta Horrific Case: पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याने महाराष्ट्र हादरला आहे. वर्दळीच्या स्वारगेट बस स्थानक परिसरात ही घटना घडल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अशातच आता जगातील सर्वात धक्कादायक प्रकरण चर्चेत आले आहे. एक तरुणीवर 100 जणांनी 44 दिवस 400 वेळा केला बलात्कार केला होता. हे सर्व प्रकरण अत्यंत धक्कादायक रित्या उघडकीस आले होते. जाणून घेऊया हे प्रकरण नेमकं आहे तरी काय?

जगातील हे सर्वात धक्कादायक बलात्कार प्रकरण जपानमधील सैतामा शहर घडले होते. जुन्को फुरोटा नावाच्या तरुणीसह कुणी कल्पनाही करु शकत नाही इतके भयानक कृत्य घडले आहे. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली जुन्को आयुष्यात काही तरी मोठं करुन दाखवायची असं स्वप्न पाहत होती. यासाठी कॉलेज करता करता जुन्कोने पार्ट टाईम जॉब सुरु केला. कॉलेजवरुन सुटली की ती जॉबला जायची. यामुळे तिला घरी जायला रात्र व्हायची. एक रात्र मात्र, तिच्यासाठी काळरात्र ठरली आणि तिचे संपूर्ण आयुष्य उद्धवस्त झाले. 

जुन्को नेहमी प्रमाणे सैतामा शहरातून पायी चालत घरी निघाली होती. यावेळी चार ते पाच जणांच्या टोकळ्यांनी तिची वाट अडवत तिचे अपहरण केले. अपहरण करत या टोळक्यांनी तिला एका अज्ञात ठिकाणी नेले. सर्व नराधमांनी तिच्यावर शारिरीक अत्याचार केला. यानंतर या टोळक्याने तिला कैद करुन ठेवले. जुन्कोच्या आई वडिलांनी तिचा शोध घेत पोलिस ठाण्यात जाऊ नये यासाठी तिला तिच्या घरच्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधायसा सांगितला. तसेच मी मैत्रिणीकडे राहत असून मी ठीक आहे असे सांगण्यास सांगितले. जीवे मारण्याची धमकी देत त्यांनी जुन्कोवर दबाव आणला.

जुन्कोला एका घरात कैद करुन ठेवल्यानंतर आरोपींनी क्रुरतेचा कळस गाठला. तब्बल 44 दिवस जुन्को या नराधमांचा अत्याचार सहन करत होती. 44 दिवसात आरोपींसह तब्बल 44 जणांनी 400 वेळा पेक्षा जास्त वेळा तिच्यावर बलात्कार केला. 
नराधमांनी तिच्या प्रायव्हेट पार्टला टोकदार वस्तूंनी वेदना दिल्या. बराच वेळ ते तिला नग्न अवस्थेत ठेवत होते. तिला अन्न पाणीही देत नव्हते. भूकेने व्याकुळ झाल्यावर ते झुरळ खायला आणि मुत्र प्यायला भाग पाडत होते. तिचे शरीर जखमांनी भरले होते. जखमेला किड लागली होती. तिच्या शरीरातुन उग्र वास येत होता. ती नराधमकांकडे मृत्यूची भीक मागत होती. मात्र, त्यांचा अत्याचार काही थांबत नव्हता. यातच तिला अपहरण करुन आणलेल्या टोळीतील एक तरुणाने तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. 

असे उघडकीस आले सर्व प्रकरण

नराधमाच्या मारहाणीत जुन्कोचा मृत्यू झाल्यांनतर हे सर्व प्रकरण उघडकीस आले. जुन्कोचा मृत्यू झाल्यानंतर आरोपीने तिच्या मृतदहे प्लास्टिकच्या पिशवीत भरुन एका निर्जन स्थळी फेकून दिला. यानंतर याच आरोपीने आणखी एका मुलीला आपल्या वासनेचा शिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी पोलिसंच्या तावडीत सापडला. यावेळी पोनिस चौकशी दरम्यान आरोपीने जुन्कोच्या नावाचा उल्लेख केला. यामुळे पोलिसांनी आरोपीचा कसून चौकशी केली असता त्याने जुन्कोसह केलेल्या धक्कादायक कृत्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीने सांगितल्या प्रमाणे घटनास्थळी जाऊन जुन्कोचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाची अवस्था पाहून पोलिसही हादरले. पोलिसांनी तात्काळ जुन्कोच्या आई वडिलांना तिच्या मृत्यूबाबत सांगितले. जुन्कोसह घडलेले कृत्य समजल्यावर तिच्या आई वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला. 1971 मध्ये जुन्कोचा जन्म झाला होता. 1988 मध्ये हे प्रकरण घडले त्यावेळेस ती 17 वर्षांची होती. गुगलवर देखील जुन्कोसह घडलेल्या या धक्कादायक कृत्याची माहिती उपलब्ध आहे.