Influencer Earning Money by Lying On Bed : गेल्या काही दिवसांपासून चीनची एक इन्फ्लुएन्सर गु सिसी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्याचं कारण म्हणजे तिनं असा दावा केला आहे की ती फक्त अंथरूनावर पडून एका दिवसात 35 लाख रुपये कमवते. 8 ते 16 फेब्रुवारी दरम्यान, तिनं तिच्या Douyin शॉपच्या मदतीनं (टिकटॉकचा चीनी व्हर्जन) एकूण 1.039 कोटी युआन म्हणजेच 12 कोटी रुपयांची विक्री केली. त्यामुळे तिला 3 कोटी रुपयांचं कमीशन मिळालं. दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरही सुरु असलेल्या विक्रीतून एका आठवड्यात तिनं 89 लाख युआन (सुमारे 10 कोटी रुपये) कमावले.
एका लाइव्ह स्ट्रीम दरम्यान, सिसीनं या पैशांना मेहनतीची कमाई म्हटलं आणि त्यासोबत सांगितलं की लोकं जितकं तिला ट्रोल करतात, तितकीच ती पैसे कमावते. साउथ चाइना मॉर्निंग पोस्टनुसार, तिनं स्पष्ट केलं की तिला महिन्यात काही लाख युआन कमवायचे नाहीत. तर रोज तितकी रक्कम कमावण्याचं तिचं लक्ष आहे.
सिनीनं पुढे सांगितलं की 'आज मी संपूर्ण दिवस अंथरुनावर लोळत होते, काही केलं नाही आणि तरी सुद्धा माझ्या Douyin शॉपवर 11.6 लाख युआनची विक्री झाली. त्यात जवळपास माझं कमिशन हे 3.03 लाख युआन आहे. मी जितकी यशस्वी होते ते पाहून तुम्ही सहन करु शकत नसाल आणि माझ्यावर टीका करत असाल, तितकीच मी कमावते. महत्त्वाचं म्हणजे महिन्या भरात लाखो युआन कमावण्याविषयी हे नाहीच. हे प्रत्येक दिवशी युआन कमावण्याविषयी आहे. समजलं?'
गु सिसीनं पुढे याविषयी सविस्तर सांगितलं की 'तुम्हाला माहित आहे का की मी माझ्या व्यवसायात किती विक्री किती झाली हे का दाखवत नाही. जेव्हा केव्हा मी असं करते तेव्हा काही ना काही अडचण येते? त्रास होतो ना? यावेळी याचीच चर्चा आहे? हेच कारण आहे की इन्फ्लुएन्सर हे गरीब असल्याचं नाटक करतात. आम्ही चोरी केली नाही किंवा आम्ही कुठे जाऊन दरोडा टाकलेला नाही. ते काही पैसे कमावले आहेत ते कठोर परिश्रमातून मिळवले आहेत. मी दिवसभर काहीही केलेलं नाही असं जेव्हा मी सांगते तेव्हा मी लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करत असते. तुम्हाला वाटतं का की मी दिवसभर काहीच करू शकत नाही? मी फक्त त्या लोकांना चिडवण्यासाठी असं म्हटलं होतं.'
हेही वाचा : 'मी मुंबई किंवा भारतात पोहत नाही'; सोनाक्षी सिन्हाने सांगितलं कारण, 'मला भितीये की माझा...'
1998 मध्ये जियांग्सू इथ्या नांटोंगमध्ये गु सिसीचा जन्म झाला. गु सिसीनं अनेकदा लोकांचं लक्ष वेधलं आहे. तिनं काहीतरी विचित्र कंटेट शेअर केल्यामुळे तिचं अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे. आपल्या लाइव्ह स्ट्रीममध्ये तिनं सांगितलं की 15 वर्षांची असताना तिनं एक भांडण केलं त्यामुळे ती अडीच वर्षे तुरुंगात होती. गु सिसीच्या या विधानामुळे सोशल मीडियावर एक नवीन वाद निर्माण झाला आहे. काही लोक तिची कमाई पाहून आश्चर्यचकित होतात, तर काही तिच्या बोलण्यावर रागावतात.